• A
  • A
  • A
उजनी धरणातील ३८ बोटी जिलेटीन लावून उडविल्या

सोलापूर - उजनी धरणातून बेकायदा वाळू चोरणाऱ्या वाळू माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. उजनी धरणामध्ये यांत्रिक बोटी टाकून वाळू उपसा करणाऱ्या ३८ यांत्रिक बोटी जिलेटीन लावून उध्वस्त करण्यात आल्या आहेत. उजनी जलाशयातील वाळूमाफियावर करमाळा, दौंड, इंदापूर या ३ तहसिल कार्यालयाने ही संयुक्त कारवाई केली आहे.


उजनी धरणातील वाळू चोरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यासह जवळपास कोठेही अधिकृत वाळूचा मोठा ठेका नसल्यामुळे आता वाळू माफिया हे उजनी धरणातून वाळू चोरी करत आहेत. उजनी जलाशयात वाळूमाफियांवर कारवाईचे सत्र सुरू असले तरी रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाळू उपसण्याचा सपाटा वाळू माफियांनी लावला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. वाळू माफिया हद्दीचा फायदा घेत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई होत नव्हती. मात्र करमाळा, इंदापूर,दौंड, करमाळा या ३ तहसील कार्यलायाच्या संयुक्त विद्यमाने उजनी जलाशयात वाळू चोरीवर मोठी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत ३८ बोटी जिलेटिन च्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यामुळे सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत उध्वस्त करण्यात आला. ३८ बोटी एकाच वेळी कारवाई करून उद्ध्वस्त केल्याने उजनी जलाशयातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. उजनी जलाशयात वाळू माफियांवर कारवाई होत असताना वाळू माफिया नेहमी त्या गावाची हद्द ओलांडून दुसऱ्या तालुक्याच्या हद्दीत जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात अडचण येत होती. त्यामुळे संयुक्त कारवाई केल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर बोटी उध्वस्त करता आल्या आहेत.
या कारवाईमध्ये करमाळयाचे तहसीलदार सुशिल बेल्हेकर, इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, दौंड तहसीलदार बालाजी सोमवंशी, केतूर महसूल मंडलाधिकारी सुहास बदे, संजय शेटे, एस.यु. डिकोळे, सुरेश राऊत, विवेक कसबे, टी. बी. मोरे, मयूर गावडे, आर. एच. माने, आनंद ढोणे, या तलाठ्यांसह औट पोस्टचे समीर खैरे कात्रज पोलीस पाटील सोमनाथ पाटील आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES