• A
  • A
  • A
लोकसभेसाठी सोलापुरातून सुशीलकुमार शिंदेच पुन्हा काँग्रेसचे उमेदवार

सोलापूर - अपेक्षेप्रमाणे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि जेष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नाव सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून आज जाहीर करण्यात आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या सोलापूरकरांनी देशाच्या गृहमंत्रीपदी असलेल्या सुशीलकुमारांना घरी बसवून भाजपच्या ऍड. शरद बनसोडे यांना दिल्लीला पाठवले होते. त्यानंतर आता पुन्हा लोकसभेची निवडणूक लागल्याने शिंदे नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत.


हेही वाचा - गडकरी विरुद्ध नाना पटोले लढणार, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी शिंदे यांचा सुमारे दीड लाख मतांनी पराभव केला होता. मात्र, आता सोलापुरातली परिस्थिती बदलली आहे. शरद बनसोडे यांना त्यांच्याच पक्षातून विरोध होत आहे. म्हणूनच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुण्याच्या राज्यसभा खासदारांचे नाव पुढे केले. त्याच्यावर कुरघोडी केली पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी, पालकमंत्र्यांनी लिंगायत मत लक्षात घेऊन धर्मगुरू डॉ. जय सिद्धयेश्वर महास्वामी यांचे नांव पुढे केले. त्यामुळे सोलापूर लोकसभेसाठी भाकपचा उमेदवार कोण याचा गोंधळ आहे. काँग्रेसशी दोन हात करण्याऐवजी गटबाजीने पोखरलेली भाजप पाडा-पाडीच्या राजकारणात आतापासूनच व्यग्र असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहर- जिल्ह्यातील कार्यकर्ते गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत.
सुशिलकुमार शिंदेंच्या उमेदवारीनंतर आता सोलापूरकरांना प्रतीक्षा आहे ती, शिंदे यांच्या विरोधात कोण-कोण रिंगणात उतरणार याची. राजकीय पातळीवर उमेदवार जाहीर करण्यात सध्या भाजपचा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES