• A
  • A
  • A
शरद पवारांची माढ्यातून माघार, हा भाजपचा पहिला विजय - सहकारमंत्री देशमुख

सोलापूर - शरद पवार यांना पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. पवार साहेबांनी उमेदवारी मागे घेणे हा भाजपचा पहिला विजय आहे, असे वक्तव्य सहकरमंत्री सुभाष देशमुख यांना केले आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून उमेदवारी मागे घेतल्यानंतर सहकार मंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुभाष देशमुख हे माढा लोकसभेचे भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत.


हेही वाचा-सोलापूर जिल्ह्यात ११ आंतरराज्य चेक पॉईंट; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना
पुढे बोलताना सुभाष देशमुख म्हणाले, की शरद पवारांना माढा मतदार संघातून उमेदवारी लढवायची होती. त्यांनी तसे जाहीरही केले होते. पवार साहेबांनी का उमेदवारी मागे घेतली माहित नाही. मात्र, यामुळे देशातील पहिला विजय भाजपचा झाला असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पवार साहेबांना समोर पराभव दिसत असेल त्यामुळे त्यांनी उमेदवारी मागे घेतली असेल, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा-आचारसंहिता लागू; सोलापूरच्या महापौर बनशेट्टींनी रस्त्यातच सोडली शासकीय गाडी


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES