• A
  • A
  • A
आचारसंहिता लागू; सोलापूरच्या महापौर बनशेट्टींनी रस्त्यातच सोडली शासकीय गाडी

सोलापूर - लोकसभा निवडणुकीची आज आचारसंहिता लागू झाली. यानंतर आचारसंहितेची तत्काळ अंमलबजावणी सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी केल्याचे दिसून आले. आचारसंहिता जाहीर झाल्याचे समजल्यानंतर बनशेट्टी यांनी महापालिकेची गाडी प्रवासादरम्यान अर्ध्यावर सोडली. यानंतर त्या ऑटोने घरी गेल्या.


हेही वाचा - लोकसभा निवडणूक : राज्यात ४ टप्प्यात मतदान, २३ मेला मतमोजणी
निवडणूक आयोगाने आज लोकसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तत्काळ आचारसंहिता देखील लागू करण्यात आली. यामुळे बनशेट्टी यांनी त्या वापरत असलेल्या महापालिकेची शासकीय गाडी शहरात रस्त्यावरच सोडून दिली. त्यानंतर चालक ती गाडी घेऊन पालिकेकडे निघून गेला. तर बनशेट्टी ऑटोरिक्षामध्ये बसून घराकडे गेल्या.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES