• A
  • A
  • A
राज्यातील पहिले रेशीम पार्क सोलापुरात, वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले भूमिपूजन

सोलापूर - राज्यातील पहिले रेशीम पार्क सोलापुरात होत आहे. या रेशीम पार्कचे भूमिपूजन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते पार पडले. येत्या 9 महिन्यात रेशीम पार्क उभे राहणार असून त्याचा मोठा फायदा रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांनी रेशीम उत्पादनाकडे वळावे अशी विनंती वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.


हेही वाचा - पंढरपूर शहरात जड वाहनांना महिनाभर 'नो एंट्री'
राज्यात रेशीम कोष उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, या शेतकऱ्यांना त्यांचे रेशीम कोष विकण्यासाठी राज्यात बाजारपेठ उपलब्ध नव्हती. यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गोष्ट लक्षात घेऊन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुखानी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची सोय व्हावी व त्यांच्या रेशीम कोषाला बाजारपेठ मीळावी त्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी रेशीम पार्कची सोलापुरात घोषणा केली होती. या रेशीम पार्कचे वस्त्रोद्योग मंत्री यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी हा त्यांनी उत्पादित केलेला रेशीम कोश कर्नाटकातील रामनगर येथील रेशीम कोष बाजारामध्ये विक्रीसाठी नेतो. यामध्ये मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकरीही आपला रेशीम कोष रामनगर च्या बाजारात नेऊन विकतात. शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात उत्पादीत केलेल्या शेतीमालाला राज्यात बाजारपेठ नव्हती. उत्पादित केलेला रेशीम कोष कर्नाटकात नेऊन त्यांना विकावा लागत होता. यामुळे विक्री व्यवस्थापना नंतर शेतकरी पुरता बेझार झाला होता. ही समस्या लक्षात घेऊन रेशीम संचालनालयाच्या वतीने रेशीम पार्क उभारण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरोज या ठिकाणी हे रेशीम पार्क उभे राहत आहे. रेशीम पार्कच्या बांधकामाचे टेंडर पूर्ण झाले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. पुण्यातील एका कंपनीला त्याचे काम मिळाले असून येत्या नऊ महिन्याच्या काळात तयार होणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले. सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या हिरज या गावांमध्ये हे रेशीम पार्क उभे राहत आहे. याठिकाणी रेशीम विक्रीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. तुती लागवड करून रेशीम कोष निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण रेशीम पार्कमध्ये मिळणार आहे.

हेही वाचा - माढा मतदार संघात भाजप सक्रिय; सुभाष देशमुख गावभेट दौऱ्यावर
सोलापूर जिल्ह्यात रेशीम पार्क होत असल्यामुळे सोलापूर सहज मराठवाड्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या रेशीम पार्कचा भविष्यात त्यांना खूप मोठा फायदा होणार असल्याचे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. सोलापूर रेशीम पार्क झाल्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी असोसिएशन ही स्थापन केली आहे. शेतकरीच रेशीम कोळसा पासून धागा निर्मिती आणि त्यानंतर कापड निर्मिती करून शेतकरी ते उद्योजक असा प्रवास सिल्क फेडरेशनच्या माध्यमातून करणार असल्याचेही रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES