• A
  • A
  • A
माढा मतदार संघात भाजप सक्रिय; सुभाष देशमुख गावभेट दौऱ्यावर

सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सध्या माढा लोकसभा मतदार संघात भेटीगाठी घेत आहेत. करमाळा तालुक्यातील देवळालीमध्ये शुक्रवारी त्यांनी माढा लोकसभेची भाकरी कधीतरी फिरवा, असे आवाहन ग्रामस्थांना केले. माढा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. यामुळे भाजपला शिरकाव करणे मोठे अवघड काम असले तरी त्यासाठी सहकारमंत्री कामाला लागले आहेत.


हेही वाचा -
जम्मू-काश्मीर : राहत्या घरातून जवानाचे दहशतवाद्यांकडून अपहरण
निवडणूक रणधुमाळीच्या पूर्व तयारीच्या उद्देशाने सुभाष देशमुख यांचा करमाळा तालुक्यात गावभेट दौरा केला आहे. कुंभेज, देवळाली, रायगाव, पांडे, फिसरे या गावांना देशमुख यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. करमाळा तालुक्यातील देवळालीमध्येही देशमुख यांची सभा झाली. जेऊर ग्रामपंचायत येथे सुभाष देशमुख यांचा सत्कार शिवसेना आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते झाला.

हेही वाचा - लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी होणार जाहीर; अशी असेल व्यवस्था
या गावभेट दौऱ्याचे आयोजन भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले होते. त्या भेटीदरम्यान प्रमुख पदाधिकारी जेष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन, महाराष्ट्र चॅम्पियन अपसर जाधव, तालुका उपाध्यक्ष काकासाहेब सरडे दादासाहेब देवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES