• A
  • A
  • A
पंढरपूर शहरात जड वाहनांना महिनाभर 'नो एंट्री'

सोलापूर- पंढरपूर शहरातून जाणारी जड व अवजड वाहनांची वाहतूक बाह्यवळण मार्गावरुन वळविण्यात आली आहे. अवजड वाहनांना पंढरपुरात बंदी घालण्यात आल्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. मुंबई पोलीस कायदा १९५१२ च्या कलम ३३ (१) (ब) अन्वये ९ मार्च २०१९ ते ७ एप्रिल २०१९ या कालावधीसाठी हे आदेश लागू करण्यात आले आहे.


या मार्गे होईल वाहतूक-
९ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीमध्ये सोलापूर, बार्शी, नगरकडून नियमितपणे जड वाहने येतील. पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरुन महुद, सांगोला, मंगळवेढाकडे जाणाऱया जड व अवजड वाहनांना मोहोळ शिवाजी चौक, शेटफळ फाटा, वेणेगाव फाटा, अहिल्यादेवी चौक, नवीन सोलापूर नाका, कवठाळी बायपास, कॉलेज क्रॉस रोड, नवीन कराड नाका पंढरपूर मार्गे जाण्यास प्रवेश खुला राहणार आहे.
हेही वाचा-उजनी प्रकल्पासाठी २ हजार ६२२ कोटींची मान्यता
तसेच विजापूर, कोल्हापूर, सांगली कडून नियमीतपणे जड वाहने येतील. पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरुन टेभुर्णी, शेटफळ, मोहोळकडे जाणाऱया जड-अवजड वाहनांना मंगळवेढा नाका, सांगोला नाका, महुद फाटा, साळमुख फाटा येथून पंढरपूर मार्गे नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड कवठाळी बायपास, नवीन सोलापूर नाका, आहील्यादेवी चौक मार्गे जाण्यास प्रवेश खुला राहणार आहे.
हेही वाचा-सुभाष देशमुखांनी घेतली नारायण पाटलांची भेट, माढ्यातून पवार विरुद्ध देशमुख 'सामना'?
सोलापूर, बार्शी, नगर बाजुकडून नियमीतपणे येतील. पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरुन वेळापूर, अकलुज, सातारा, पुणेकडे जाणाऱया जड व अवजड वाहनांना मोहोळ शिवाजी चौक, शेटफळ फाटा, वेणेगाव फाटा, अहिल्यादेवी चौक, नवीन सोलापूर नाका, कवठाळी बायपास, कॉलेज क्रॉस रोड, नवीन कराड नाका, संत ज्ञानेश्वर चौक, साळमुख फाटा येथून जाण्यास प्रवेश खुला राहील.
सातारा, पुणे, वेळापूर, अकलुज बाजुकडून नियमीतपणे वाहने येतील. पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरुन सोलापूर, बार्शी, नगरकडे जाणाऱया जड व अवजड वाहनांना संत ज्ञानेश्वर चौक वेळापूर, साळमुख फाटा, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड कवठाळी बायपास, नवीन सोलापूर नाका, अहिल्यादेवी चौक, वेणेगाव फाटा, शेटफळ फाटा, शिवाजी चौक मोहोळ येथुन जाण्यास प्रवेश खुला राहील.
स्थानिक व्यापाऱ्यांच्या वाहनांना प्रवेश बंद

पंढरपूर शहरात माल घेवून येणाऱया स्थानिक व्यापाऱ्यांच्या वाहनांना ( एस. टी. बस, खाजगी प्रवासी बस, अत्यावश्यक सेवेची वाहने वगळुन) ९मार्च ते ७ एप्रिल कालावधीत सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत पंढरपूर शहरात तीन रस्ता, सरगम चौक, नवीन कराड नाका, लक्ष्मी टाकळी बायपास, कासेगाव फाटा, मंगळवेढा नाका येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे. पंढरपूर गावामध्ये जड व अवजड वाहतूक न जाता ठरवून दिलेल्या पंढरपूर बाह्यवळण मार्गावरुनच जातील. तसेच बाह्यवळण मार्गावर कोणत्याही परिस्थितीत जड वाहतुक कोठेही विनाकारण थांबणार नाही, असेही पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशात नमुद केले आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES