• A
  • A
  • A
सुभाष देशमुखांनी घेतली नारायण पाटलांची भेट, माढ्यातून पवार विरुद्ध देशमुख 'सामना'?

सोलापूर - माढा मतदारसंघातून लोकसभेसाठी भाजपकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची चाचपणी सुरु असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पवार विरुद्ध देशमुख असा सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सुभाष देशमुख, यांनी करमाळा तालुक्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली.देशमुख म्हणाले, मागील साडेचार वर्षात मोदी सरकारने गरीब श्रीमंतांची दरी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यानांच नोटबंदीचा त्रास झाला आहे. मोदी सरकारने ज्या योजना राबवल्या त्याचा सर्वसामान्यांना फायदा झाला आहे. आपला देश सुरक्षित ठेवायचा असेल, तर परत एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायला हवे असे आवाहनही यावेळी देशमुखांनी केले.
आमदार नारायण पाटील म्हणाले, १९९८ पासून सुभाष देशमुख यांचा व माझा परिचय आहे. आमच्या मनामध्ये पूर्वीपासूनच देशमुख यांच्याबद्दल आदर असल्याचे नारायण पाटील म्हणाले. उजनी धरणाच्या शेजारी असलेल्या तालुक्यात १० तास लाईट चालते. तर करमाळा तालुक्यात मात्र ६ तासच वीज चालते. ऐन उन्हाळ्यात तर फक्त चारच तास वीजपूरवठा केला जातो. आम्ही रस्त्यावर उतरल्यावर पून्हा ५ तास वीजपूरवठा केला जातो. आमची विजेच्या जाचातून सुटका करा, अशी मागणी यावेळी नारायण पाटील यांनी केली.

माढा लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना उमेदवारी देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. २००९ ला माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात सुभाष देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना २ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. त्यामुळेच पुन्हा एकदा सुभाष देशमुखांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES