• A
  • A
  • A
भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादीकडून 'जवाब दो, जॉब दो' मोर्चाचे आयोजन

सोलापूर - शहर राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जवाब दो, जॉब दो' मोर्चा काढण्यात येणार आहे. बेरोजगारीमध्ये झालेल्या वाढीचा निषेध करण्यासाठी हुतात्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा मार्गक्रमण करेल, अशी माहिती राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी दिली.

संग्रहित छायाचित्र


सत्तेवर येण्यापूर्वी केंद्र सरकारमधील प्रमुख नेत्यांनी दरवर्षी २ कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु केंद्र आणि राज्य सरकारच्या नियोजन शून्य आणि निष्क्रिय धोरणांमुळे बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. दरवर्षी केंद्रीय सांख्यिकी आयोगामार्फत प्रकाशित होणाऱ्या अहवालात बेरोजगारीची खरी टक्केवारी समोर आली आहे. त्यामुळे सरकारच्या फसव्या योजनांच्या आकडेवारीचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे या सरकारच्या खोटेपणाचा बुरखा फाडण्यासाठी "जवाब दो, जॉब दो" मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बागवान यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा - जिल्हाधिकारी साहेब तुम्हीच न्याय द्या; शेळ्यांसह शेतकऱ्याचे आमरण उपोषण

या पत्रकार परिषदेत विद्यार्थी शहराध्यक्ष निशांत सावळे, कार्याध्यक्ष सुहास कदम आणि प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड उपस्थित होते. गुरुवारी होणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यासह पक्षाचे जेष्ठ नेते, पदाधिकारी सर्व सेलचे प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

हेही वाचा - नांदेडमध्ये एसी कोचेसची अज्ञातांकडून नासधूस; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES