• A
  • A
  • A
सयाजी शिंदेंच्या रोखठोक भूमिकेमुळे लोकांनी वाजवल्या टाळ्या तर सुशीलकुमार ओशाळले

सोलापूर - सोलापुरात यायला प्रलंबित विमानसेवा हीच मोठी अडचण असल्याचं वक्तव्य अभिनेता सयाजी शिंदे यांनी केलंय. ही सेवा लवकर सुरू करावी अशी मागणीही अभिनेता शिंदे यांनी दमाणी-पटेल साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याच्या व्यासपीठावर केली. विशेष म्हणजे व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.


या निमित्ताने पुन्हा एकदा सोलापूरच्या प्रलंबित विमानसेवेचा प्रश्न उपस्थित झालाय. केंद्र सरकारने आपल्या उडान योजनेत सोलापूरचा समावेश केलाय. मात्र सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी होटगी रोडवरील विमानसेवेत अडथळा ठरत आहे. तसं स्पष्टीकरण विमान प्राधिकरणानं दिलंय.

तर दुसरीकडे बोरामणी विमानतळाची फक्त जमीन घेण्यात आलीय . पण या दोन्ही योजना रेंगाळल्या आहेत. त्यामुळं कार्पोरेट उद्योजक, व्यापारी,सेलेब्रिटीज आणि साहित्य कलाक्षेत्रातील मान्यवरांची गैरसोय होतेय. एका अर्थाने सोलापूरची विमानसेवा विकासातील अडथळा ठरलीय. त्याच मुद्द्याला सयाजी शिंदे यांनी हात घातल्याने सोलापूरकरांच्या टाळ्या पडल्या अन सुशीलकुमार शिंदे ओशाळले. पण त्यांनी आपल्या भाषणात ही सेवा सुरु करण्याबाबत भाजप सरकार राजकारण करत असल्याचा आरोप करत प्रलंबित सेवेचं खापर विरोधकांच्या माथी फोडलंय.

सोलापूरला विमानसेवा कधी सुरू होणार याची फक्त चर्चा होते. पण राजकीय अनास्थेपोटी ही सेवा प्रलंबित आहे. हेच खरं वास्तव आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES