• A
  • A
  • A
विठ्ठल वाघ आणि सयाजी शिंदेंची सरकारवर बोचरी टीका

सोलापूर - दमाणी-पटेल प्रतिष्ठानच्या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार्थीनीं आजच्या सरकारची धोरणे आणि राजकीय स्थितीवर निशाणा साधला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर कवी विठ्ठल वाघ यांनी शेतकरी समस्या मांडताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अदानी-अंबानीनां लक्ष्य केले, तर अभिनेता सयाजी शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत खर्च होणाऱ्या पैशांचे गणित मांडत व्यवस्था कशी पैसेवाल्यांच्या हातात गेली यावर भाष्य केले.


हेही वाचा - भाजपने बारामतीत उमेदवार उभा करावा; जनता योग्य निर्णय करेल, सुप्रिया सुळेंचा पलटवार
साहित्य,कला आणि संस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या गुणिजनांचा गौरव करण्यासाठी देण्यात येणाऱ्या दमाणी-पटेल कर्मयोगी पुरस्काराचे आज सोलापुरात वितरण करण्यात आले. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडलेल्या सोहळ्यात कवी विठ्ठल वाघ यांना साहित्य आणि अभिनेता सयाजी शिंदे यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५१ हजार रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी व्यासपीठावर रामदास फुटाणे, बिपीन पटेल आणि राजेश दमाणी उपस्थित होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES