• A
  • A
  • A
उळे एन्काऊंटरची सीआयडी चौकशी होणार; जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसलेंची माहिती

सोलापूर - उळे एन्काऊंटर प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येईल. तसेच हे सर्व प्रकरण मानवाधिकार आयोगाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

उळे एन्काऊंटर प्रकरणी पारधी समाजातील महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयाला घेराव


शनिवारी रात्री सोलापूर तुळजापूर रोडवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पारधी समाजाचा युवक ठार झाला आहे. या घटनेनंतर पारधी समाजातील महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घालत हे बनावट एन्काऊंटर असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली होती. या मागणीनंतर जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी होईल व हे प्रकरण मानवाधिकार आयोगाकडून हाताळले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी मृताच्या नातेवाईकांना दिली.
हेही वाचा - उळे एन्काउंटर प्रकरण; काळेच्या नातेवाईंकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ
हे एन्काऊंटर बोगस असल्याचा आरोप करत पारधी समाजातील महिलांसह पुरुषांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या घरासमोर प्रचंड गोंधळ घालत अंगावर रॉकेल ओतून घेऊन सामूहिक आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सर्व महिलांना समजावून सांगत सायंकाळी ४ वाजता पोलीस अधीक्षक यांच्यासोबत नातेवाईकांची बैठक घेऊन योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले होते. त्यानंतरही या महिलांनी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर प्रचंड गोंधळ घातला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी भोसले आणि सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नातेवाईकांसोबत बैठक घेऊन या सर्व प्रकरणांमध्ये दोषींवर कारवाई करू तसेच या सर्व प्रकरणाची विशेष अशी चौकशी करू अशी माहिती नातेवाईकांना दिली.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES