• A
  • A
  • A
उळे एन्काउंटर प्रकरण; काळेच्या नातेवाईंकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ

सोलापूर - पोलीस अधीक्षक कार्यालयात पारधी समाजाच्या महिलांनी प्रचंड गोंधळ घालत पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या विनायक काळेला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पाटील आणि मृत काळेसह अन्य साथीदारांमध्ये झालेल्या चकमकीमधील गोळीबारात काळेचा मृत्यू झाला. विनायक काळे हा पारधी समाजाचा असल्याची माहिती आहे.

मृत विनायक काळेच्या नातेवाईंकाचा पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ


हेही वाचा - कंबर तलावात सापडला तरुणीचा मृतदेह
या चकमकीबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक काळे हा दरोडेखोर असून रविवारी पहाटे झालेल्या झटापटीत विनायक काळेवर गोळी झाडण्यात आली. तत्पूर्वी विनायक काळे याने तलवारीने पोलिसांवर हल्ला केला होता. त्यामुळे बचावात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली असल्याचे पीआय पाटील यांनी सांगितले. मात्र मयत विनायक काळे हा दरोडेखोर नव्हता तर पोलिसांनी जाणीवपूर्वक विनायक काळेवर गोळ्या झाडल्याचा आरोप विनायक काळेच्या नातेवाईकांनी केला आहे.
या सर्व प्रकरणात न्याय मागण्यासाठी तळे हिप्परगा येथील पारधी समाजाच्या महिला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. यावेळी विनायक काळेला न्याय द्यावा, या मागणीसाठी महिलांनी प्रचंड गोंधळ घालायला सुरूवात केली आहे. दरम्यान, थोड्यावेळातच पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले हे त्यांच्या नातेवाईकांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर पारधी समाजाच्या मागणीवर मार्ग काढण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान विनायक काळे याचा मृतदेह अजूनही नातेवाईकांनी ताब्यात घेतलेला नाही.
हेही वाचा - सोलापुरात पोलिसांची दरोडेखोरांशी धुमश्चक्री; ३ पोलीस जखमी, १ दरोडेखोर ठार

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES