• A
  • A
  • A
पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून सचिन जाधव यांची नियुक्ती

सोलापूर - हरियाणा राज्यातील कुरूक्षेत्र येथे  दि. ११ व १२ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्वच्छ शक्ती कार्यक्रम होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे  समन्वयक म्हणून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे.

सचिन जाधव


कुरूक्षेत्र येथे महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यातून महिला सरपंच व ग्रामसेविका या स्वच्छ शक्ती कार्यक्रमासाठी जात आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सचिन जाधव दि. १० फेब्रुवारीला कुरूक्षेत्र येथे पोहोचत आहेत. 'वासो'चे संचालक राहुल साकोरे यांनी सचिन जाधव यांच्या नियुक्तीचे पत्र सोलापूर जिल्हा परिषदेला पाठविले आहे. नवी दिल्ली येथे दोन महिन्यांपूर्वी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने स्वच्छ सर्व्हेयर २०१८ या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून सचिन जाधव यांची नियुक्ती केली होती. या कार्यक्रमासाठी राज्याचे समन्वय त्यांनी चांगल्या पध्दतीने केले होते. म्हणूनच यावेळी देखील त्यांची नियक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा- पोलीस भरतीबाबत सरकारचे धोरण म्हणजे अगोदर मूल आणि नंतर लग्न - भाऊसाहेब आंधळकर
सहसमन्वयक म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे माहिती शिक्षण संवाद तज्ञ उध्दव फड व उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माहिती शिक्षण संवाद तज्ञ हनुमंत गादगे यांची निवड करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथून ते कुरूक्षेत्र येथे जाणार आहेत. स्वच्छ शक्तीसाठी देशभरात स्वच्छतेत उत्कृष्ठ कार्य केलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा- 'या' कारणामुळे पवारांना वाटते गडकरींची काळजी
या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अघिकारी डॉ. राजेंद्र भारूड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी यांनी अभिनंदन केले.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES