• A
  • A
  • A
'या' कारणामुळे पवारांना वाटते गडकरींची काळजी

सोलापूर - नितीन गडकरींची काळजी वाटत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मोदींऐवजी गडकरींना पुढे केले जात आहे, असा प्रसारमाध्यमांनी प्रश्न केला असता पवारांनी हे वक्तव्य केले. भाजपमध्ये जी अस्वस्थता आहे त्याला हवा देण्याचे काम पवारांनी केले असल्याचे बोलले जात आहे.


शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगोल्यात दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते. नितीन गडकरी हे विधीमंडळापासूनचे आपले सहकारी आहेत. पंतप्रधान पदासाठी आता त्यांचे नाव समोर येत असल्याने मला त्यांची चिंता वाटत असल्याचे पवार म्हणाले.
गडकरींनी काही दिवसांपूर्वी आपण पंतप्रधानांच्या शर्यतीत नसल्याचे सांगून या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र, गडकरींच्या नावाची चर्चा काही केल्या थांबण्यास तयार नाही.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES