• A
  • A
  • A
कुरुक्षेत्रच्या 'स्वच्छ शक्ती कार्यक्रमा'साठी ५ सरपंच आणि २ ग्रामसेविकांची निवड

सोलापूर - स्वच्छ आणि सुंदर शौचालय स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या ४ महिला सरपंच व २ ग्रामसेविका यांची'स्वच्छ शक्ती कार्यक्रमा'साठी निवड करण्यात आली आहे. हा कार्यक्रम हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे ११ आणि १२ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या उपस्थित होणार आहे.


निवड झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये पंढरपूर तालुक्यातील तावशीच्या सरपंच सोनाली यादव, उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळाच्या सरपंच छाया कोळेकर, भागाईवाडीचे सरपंच कविता घोडके-पाटील, मोहोळ तालुक्यातील अर्धनारीचे सरपंच सुनंदादेवी संतोष पवार, मंगळवेढा तालुक्यातील देगावच्या सरंपच राणी ढेकळे, तावशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका ज्योती पाटील, माळशिरस तालुक्यातील रेडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका शिला साळवे यांची निवड करण्यात आली आहे. समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांची नियुक्त करण्यात आली आहे. आज नवी दिल्लीकडे सरपंच व ग्रामसेवक यांचे पथक रवाना झाले. नवी दिल्ली येथून ते कुरूक्षेत्र येथे जाणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अघिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी त्यांची निवड केली आहे.

हेही वाचा - सोलापुरात ऊस संशोधन केंद्र सुरू करणार - सुभाष देशमुख
या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, अर्थ व बांधकामचे सभापती विजयराज डोंगरे, कृषी व पशुसंवर्धनव समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील, विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे, महिला व बाल कल्याण समितीचे सभापती रजनी देशमुख व समाज कल्याण समिती सभापती शिला शिवशरण, पक्षनेते आनंद तानवडे यांनी अभिनंदन केले आहे.

होही वाचा - सांगोल्यात शेकाप आणि राष्ट्रवादीच्या वतीने संयुक्त दुष्काळी परिषदेचे आयोजन
या सर्व ग्रामपंचायतींकडून शौचालये रंगवण्यात आली असून स्वच्छतेचे संदेश देण्यात आले आहेत. रंगीत चित्रमय रित्या पेंटीग्ज केल्याने शौचालये आकर्षक दिसू लागली आहेत. वडाळा येथे सर्वाधिक १०३० शौचालये रंगवण्यात आली आहेत. देशातील सर्वाधिक शौचालये रंगवल्याची नोंद वडाळा ग्रामपंचायतीच्या नावावर आहे. अर्धनारी, तावशी, भागाईवाडी ग्रामपंचायतींनी केवळ शौचालये नाहीत तर गावातील घरे देखील रंगवली आहेत. या ग्रामपंचायती भागात शोषखड्डे असून त्या गटारमुक्त आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात व स्मार्ट ग्राममध्ये या ग्रामपंचायतींनी आपला ठसा उमटवला आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES