• A
  • A
  • A
कंबर तलावात सापडला तरुणीचा मृतदेह

सोलापूर - सोलापुरातील कंबर तलावात तरुणीचा मृतदेह सापडला आहे. शनिवारी सांयकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या कंबर तलावामध्ये मृतदेह सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


हेही वाचा-माढ्यात पवारांच्या एन्ट्रीनं भाजपचे गणित बिघडले, संजय शिंदेंचा लढण्यास नकार
सोलापुरातील धर्मवीर संभाजीराजे तलाव (कंबर तलाव) येथे तरुणीचा पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ही आत्महत्या आहे की घातपात हे अजून स्पष्ट झाले नाही.

मृत तरुणी घरातून निघून गेल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली होती. मागील २ दिवसांपासून तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली होती. तरुणीचे लग्न झालेले होते. तिचा नवरा मृत आहे तर तिला एक मूल असल्याची प्राथमिक माहिती सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुशराव यांनी दिली आहे.

हेही वाचा- पंतप्रधानपदाच्या दावेदारीसाठीच पवार पुन्हा लोकसभेच्या मैदानात..!


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES