• A
  • A
  • A
पंतप्रधानपदाच्या दावेदारीसाठीच पवार पुन्हा लोकसभेच्या मैदानात..!

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ? या चर्चेला उधाण आले असताना आज खासदार शरद पवार यांनी सांगोल्यात दुष्काळ परिषदेला हजेरी लावली. शुक्रवारी पवार यांनी मी इच्छुक नाही मात्र जेष्ठ नेत्यांचा आग्रह आहे अशी गुगली टाकल्याने आज सांगोल्यात पवार काय बोलतायत याकडे सर्वच लक्ष लागले होते. त्यावर पवारांनी २ दिवसात निर्णय घेऊ असे सांगितले. यावरून तिसरी आघाडी आणि आघाडीचे नेतृत्व गृहीत धरून पवार लोकसभेच्या मैदानात उतरत असल्याचे त्यांच्याच वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.


हेही वाचा - आगामी लोकसभा निवडणुकीत ४३ वे कमळ 'बारामतीत' फुलवणार - मुख्यमंत्री
मला पराभूत करू म्हणणाऱ्यांनी आणि माझ्या तब्येतीची काळजी करणाऱयांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी, असा चिमटा महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांना काढायलाही पवार विसरले नाहीत. माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करून येत्या २ दिवसात निर्णय घेऊ असेही पवारांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - शरद पवारांनी माढ्यातूनच लढावे, खासदार विजयसिंह मोहिते पाटलांचा आग्रह
मुळात या दुष्काळी परिषदेची सुरुवात मोदींना आव्हान देऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील यांनी केली. जर शरद पवार यांचा पराभव करायचा असेल तर मोदींनी स्वतः रिंगणात उतरावे असे खुले आव्हान दिले. यावेळी माढा मतदार संघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी व्यासपीठावरील नेत्यांनी केली. यावेळी जेष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पाठींबा दिला तर खा.विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढवावी असा आग्रह केला. महाराष्ट्र आणि दिल्लीच्या हितासाठी शरद पवार यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनीही केली.
त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा पवारचं हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे. फक्त खासदारकीसाठी नाही तर तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वात पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठीही पवार पुन्हा एकदा पावर गेम खेळणार हे आता स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा - शरद पवारांनी या वयात निवडणूक लढवू नये; भाजप करेल पराभव, चंद्रकांत...

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES