• A
  • A
  • A
निवडणुकीत दलितांची मते मिळाली नाहीत; रामदास आठवलेंचे खळबळजनक वक्तव्य

सोलापूर - २००९ च्या निवडणूकीत रिपाइंला दलितांची मते मिळाली नसल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी सोलापूर दौऱयावर आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे राजकीय वक्तव्य केले. यावेळी त्यांनी वाऱ्यासारखी दिशा बदलून सत्ता कशी मिळवावी हे प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावे, असा खोचक सल्लाही आंबेडकरांना दिला.


हेही वाचा - शरद पवार आज माढा लोकसभा मतदार संघात; सांगोल्यातील दुष्काळी परिषदेत लावणार उपस्थिती
आज सोलापूर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला रामदास आठवलेही हजर आहेत. त्यांना आज पत्रकार परिषदेत अनेक खळबळजनक वक्तव्य केले आहेत. ते म्हणतात, दलितांच्या मतांच्या विभाजनाचा फायदा भाजपला होतो. याची प्रचिती मला २००९ च्या निवडणूकीत आली. रिपाइंने या निवडणूकीत १११ जागा लढवल्या, मात्र एकही जागा जिंकली नाही. या निवडणूकीत दलितांची मते मिळाली नाहीत, असे ते म्हणाले.

हेही वाचा -सोलापुरात ऊस संशोधन केंद्र सुरू करणार - सुभाष देशमुख
प्रकाश आंबेडकरांनी सभेची गर्दी पाहून राज्यात सत्ता मिळेल या भ्रमात राहू नये. वाऱ्याची दिशा पाहून सत्ता कशी मिळवायची ते प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावे, असेही आठवले म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणूकीत रिपाइंला मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES