• A
  • A
  • A
शरद पवार आज माढा लोकसभा मतदार संघात; सांगोल्यातील दुष्काळी परिषदेत लावणार उपस्थिती

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे माढा लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला येथे दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या दुष्काळी परिषदेचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.


हेही वाचा - माढ्यातून शरद पवार लोकसभा लढवणार नाहीत; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण
शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला मध्ये ही दुष्काळी परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुष्काळ जाहीर होऊन ३ महिने उलटले तरी राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दुष्काळी भागातील जनतेसाठी कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करणे गरजेचे असतानादेखील सरकार फक्त घोषणा करण्यातच दंग आहे, असा आरोप करत शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सांगोल्यात दुष्काळी परिषद आयोजित करण्यात आली.

हेही वाचा - आधी लोकसभा लढू मग विधानसभेचे बघू - विनोद तावडे
शुक्रवारी पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी ते सांगोला येथे दुष्काळी परिषदेला हजेरी लावत आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत अशाच पद्धतीने ऐनवेळी शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES