• A
  • A
  • A
'आयजी' झाले कायद्यापेक्षा मोठे, पादचाऱ्याच्या मृत्यूनंतरही वाहन दिले सोडून

सातारा - महामार्गावर एका पादचाऱ्याला ठोकरून जाणारी गाडी पोलिसांनी सोडून दिल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. पादचाऱ्याला उडवून जाणाऱ्या कारमध्ये विशेष महानिरीक्षकचा दर्जाचे अधिकारी असल्याचे कळताच पोलिसांनी त्यांना काही घडलेच नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. या अपघातात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा - महाराष्ट्र बँकेवर दरोडा; २२ लाखांसह १० तोळे सोने लंपास, दरोडेखोरांचा गोळीबार
पादचाऱ्याला ठोकर देऊन निघून जाणाऱ्या वाहनाला नागरिकांनी पाठलाग करून पकडले आणि वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु, वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे समजल्यावर त्यांना गाडीसहित सोडून देण्यात आले. त्यामुळे कायद्यापेक्षा कोणीच मोठे नसल्याचे सांगणाऱ्या पोलिसांनी मात्र, कायद्यापेक्षा आयजी मोठा असल्याचे दाखवून दिले आहे.
हेही वाचा - सातारा, माढा लोकसभा मतदारसंघातील हालचालींना वेग; उमेदवारांच्या गावभेटी वाढल्या
या अपघातात जखमी झालेल्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावरील साताऱ्याच्या हद्दीत काळ्या रंगाची गाडी (एम एच ०९ इ.इ ०१०८) एका पादचाऱ्याला जोरदार धडक देऊन निघून गेली. अपघातानंतर संबंधित कार तिथे न थांबता निघून गेली असता स्थानिकांनी अपघात पाहिल्यानंतर गाडीचा पाठलाग केला व आनेवाडी टोल नाक्यावर ती गाडी अडवली. पकडलेली कार आणि चालकाला स्थानिकांनी पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, गाडीत विशेष पोलीस महानिरीक्षक असल्याचे लक्षात आल्यावर सामान्य लोकांना कायद्याचा धाक दाखवणाऱ्या पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाला सोडून देण्याचा प्रताप केला. याप्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी काही बोलण्यास नकार दिला आहे. गाडीत असलेल्या पोलीस अधिकार्‍याचे नाव कौसर खलील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES