• A
  • A
  • A
महाराष्ट्र बँकेवर दरोडा; २२ लाखांसह १० तोळे सोने लंपास, दरोडेखोरांचा गोळीबार

सातारा - कराड तालुक्यातील शेनोली येथे महाराष्ट्र बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी गोळीबार केला. यावेळी दरोडेखोरांनी २२ लाख रुपये व १० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना आज दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास घडली.

लुटण्यात आलेली बँक


सोमवारी महाराष्ट्र बँकेच्या शेनोली शाखेचे कामकाज नेहमी प्रमाणे सुरू होते. दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास बँकेतील कर्मचारी आपल्या कामात व्यस्त होते. ते उपस्थित पाच ते सहा ग्राहकांना सेवा देत होते. अचानक दोन चार चाकी वाहनांमधून आलेल्या चौघांनी हातात पिस्तूल घेऊन बँकेत प्रवेश केला. पिस्तुलाचा धाक दाखवून तसेच भिंतीवर गोळीबार करत दरोडेखोरांनी भीती दाखवली. दरोडेखोरांनी बँकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी व ग्राहकांना बँकेतील रुममध्ये कोंडून ठेवले, त्यानंतर दरोडेखोरांनी केबिन व स्ट्राँग रुममधील सुमारे २२ लाख रुपयांची रोख रक्कम व दहा तोळे सोन्याचे दागिने पोत्यांमध्ये भरुन तेथून पोबारा केला.

यावेळी पळत असताना दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांची व ग्राहकांचे ५ मोबाईल हिसकावून नेले. भरदुपारी बँकेवर पडलेल्या दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांच्यासह पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी सातारा, सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपधीक्षक नवनाथ ढवळे हे घटनास्थळी तपास करत आहेत. डॉगस्कॉडला देखील पाचारण करण्यात आले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES