• A
  • A
  • A
हम साथ साथ है, शरद पवारांच्या मध्यस्थीने दोन्ही राजांचं 'मनोमिलन'

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर अखेर खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन झाले आहे. सातारा लोकसभेचा तिढा सुटला असून उदयनराजे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आगामी निवडणुकीत उदयनराजेंचे काम करण्याची ग्वाही साताऱ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत दोघांमधील वादावर पडदा टाकण्यात आला आहे. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर दोन्हीही राजेंचे मनोमिलन झाले. उदयनराजे यांच्या कारभारामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे. दोन्ही राजेंच्या गटामध्ये मधल्या काळात जोरदार राजकीय संघर्ष झाला होता. त्यातून राष्ट्रवादीच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांचे काम न करण्याचा निर्णय शिवेंद्रराजे यांनी घेतला होता. पक्षश्रेष्ठींना तसे कळवण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा साताऱयाचा उमेदवार ठरत नव्हता.

निवडणुकीसाठीच्या अनेक बैठका होऊन ही राष्ट्रवादीने उदयनराजेंना वेटिंगवर ठेवल्याने ते अस्वस्थ होते. मुख्यमंत्र्यांची स्तुती करत त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यामुळे राष्ट्रवादी सावध झाली होती. पश्चिम महाराष्ट्रातील हक्काची जागा हातातून जाऊ नये म्हणून अखेर शरद पवारांनी साताऱ्यातील वादावर लक्ष घालत दोन्ही राजेंचे मनोमिलन घडवून आणले.


आज मुंबईत सातारच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. दोन्ही राजे यावेळी उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. चर्चेअंती पक्षातील वादावर पडदा टाकण्यात आला आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत एकदिलाने काम करण्याचे ठरवल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळीरामराजे नाईक निंबाळकर, शशिकांत शिंदे तसेच जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES