• A
  • A
  • A
साताऱ्यात जळालेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह

सातारा - शहराच्या उपनगरातील पिरवाडी चाहूल हद्दीत गोरखपूरकडे जाणाऱ्या पाणंद ररत्यावर एका झाडाखाली २५ वर्षीय अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला. धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता.


हेही वाचा -सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी १ कोटी २९ लाखांचा पुरवणी आराखडा
सोमवारी पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर परिसरातील खळबळ उडाली. शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. प्राथमिक पाहणीनंतर पोलिसांनी घातपाताची शंका व्यक्त केली.

पोलिसांनी श्वानपथकासह, न्यायवैद्यक तज्ञांना प्राचारण केले. मृत युवकाचे वय अंदाजे २५ वर्षे असल्याचे समजते. युवकाची अजून ओळख पटलेली नाही. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, शहर पोलीस ठाण्याचे प्रदीप जाधव हेदेखील घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचा -आमदार गोरेंच्या बंगल्यात राजकीय खलबते; माढ्यात नेमकं शिजतय तरी काय?

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES