• A
  • A
  • A
उदयनराजेंच्या अडचणीत वाढ? शिवेंद्रराजेंनी घेतली लोकसभेच्या संभाव्य भाजप उमेदवाराची भेट

सातारा - राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील यांची एका हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अनिल देसाईदेखील उपस्थित होते. यामुळे जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलणार का? याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.


हेही वाचा - साताऱ्यात उदयनराजें विरोधात नरेंद्र पाटील रंगणार 'सामना' ?
आज आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि माथाडीचे नेते व भाजपचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी एकत्र आले होते. त्यामुळे भाजपच्या मित्राला भेटून शिवेंद्रराजे यांनी खासदार उदयनराजे यांना धक्का देण्यासाठी मोर्चेबांधणी तर केली नसावी ? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील दोन्ही राजेंमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. पण आमच्यात मनोमिलन होण्याचा प्रश्नच नाही, असे म्हणत शिवेंद्रराजेंनी आपण अजून ही उदयनराजेंवर नाराज आहोत, असे म्हटले होते.

हेही वाचा - खासदार उदयनराजेंवर शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते नाराज
शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटील यांच्यातील भेटीने उदयनराजे यांच्या अडचणीत वाढ होणार का ? याकडे आता साऱ्या जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES