• A
  • A
  • A
साताऱ्यात उदयनराजें विरोधात नरेंद्र पाटील रंगणार 'सामना' ?

सातारा - लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत. तसंतसे राजकीय वातावरण तापत आहे. सातारा मतदारसंघातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजे भोसले यांची लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अशातच आता या मतदारसंघातून माजी आमदार नरेंद्र पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक आण्णासाहेब पाटील यांचे पु्त्र आहेत. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण येथे नरेंद्र पाटील यांची पकड आहे. त्यामुळे या भागातील लोकांचा नरेंद्र पाटलांना पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात भाजपकडून नरेंद्र पाटलांना उतरवण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपने सातारा मतदारसंघ हा रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिला होता. मात्र, यावेळी ही जागा भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आठवले आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES