• A
  • A
  • A
डॉ. संजय राऊत यांना शोधण्यात पोलीस यशस्वी, ३ आरोपी ताब्यात

सातारा - डॉक्टर संजय राऊत यांच्या अपहरण प्रकरणी पोलिसांकडून ३ जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री घरी जाताना राऊत यांचे अपहरण करण्यात आले होते. ही कारवाई फलटण पोलिसांकडून करण्यात आली.


हेही वाचा-खासदार उदयनराजेंवर शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते नाराज
मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारीला रात्री १० वाजण्याच्या सुमारास डॉक्टर संजय कृष्णाजी राऊत हे लाईफलाईन रुग्णालयातून त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात आरोपीने त्यांचे चारचाकी वाहनातून अपहरण केले. यानंतर रात्री ११ अकरा वाजता डॉ. राऊत यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून मॅनेजरला फोन करून ४ ते ५ कोटी रुपये मध्यरात्रीपर्यंत जमवण्यास सांगितले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिजित पाटील फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी डॉक्टर संजय राऊत यांच्या शोधासाठी पथक रवाना केल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा-साताऱ्यात दहशतवाद्यांची प्रतिकात्मक तिरडी; पुलवामा हल्ल्याचा केला निषेधCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES