• A
  • A
  • A
खुन प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ५ दिवसात केले जेरबंद

सातारा - कराड तालुक्यातील मलिखेड गावाच्या शेतपरिसरात स्वप्निल गणेश सुतार या तरूणाचा गळा चिरून खून करण्यात आला होता. या खुन प्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी आरोपीला घटनेनंतर ५ दिवसात अटक केली. या गुन्ह्यात आरोपींने कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. मात्र, पोलिसांनी अचूक तपास करुन आरोपीला जेरबंद केले आहे.



स्वप्निल गणेश सुतार (वय २३) या तरुणाचा मृतदेह मलिखेड परिसरातील ऊसाच्या शेतात आढळला. हा तरूण कोल्हापूर जिल्ह्यातील सोनार्ली वसाहत पेठ वडगाव येथील रहिवासी होता. तेव्हा याबाबत पोलीस अज्ञाताविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. या खून प्रकरणात आरोपीने कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. त्यामुळे याचा शोध घेणे हे पोलिसांसमोरील एक आव्हान होते.

पाचगणीत पॅराग्लायडिंग करताना परदेशी नागरिकाचा मृत्यू

असा केला तपास - याबाबत मिळालेली माहिती अशी, १० फेब्रुवारीला नवले ब्रिज पुणे येथून स्वप्निल रात्री नऊच्या सुमारास नॅशनल हायवे वरून कोल्हापूरला प्रवास करत असल्याची माहिती नातेवाईक व मित्रांकडून पोलिसांना तपासात मिळाली. त्या दृष्टीने तपास करत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने खेड शिवापुर, किणी टोल नाक्यावरील प्रवास करत असलेल्या वाहनाची माहिती पोलिसांनी घेतली.
साताऱ्याच्या चारा छावणीत शेतकऱ्यांनी वाहिली जवानांना श्रद्धांजली
संशयित आरोपी व मृत स्वप्निल सुतार एका ट्रकमधून कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करत असल्याचे टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये निष्पन्न झाले. तेव्हा पोलिसांनी ट्रकची माहिती घेऊन कर्नाटक राज्यातील संशयित ट्रक व त्या ट्रकवर काम करणाऱ्या संदीप शिवशंकराप्पा बुडगी (वय ३१ रा. बावीकेरे ता. नेलमंगला जि. बेळगाव कर्नाटक) या व्यक्तीची चौकशी केली. तेव्हा संदीप यांने हा खून चोरी व लूटमारीसाठी केला असल्याचे कबुली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला दिली. तेव्हा या प्रकरणाचा छडा लागला.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES