सातारा - शासनाने दुष्काळ जाहीर करून तीन ते चार महिने उलटले. मात्र, ना शेतकऱ्यांना कोणत्या सवलती भेटल्या ना विद्यार्थी वर्गाला सवलती मिळाल्या. असाच काहीसा प्रकार सातारा जिल्ह्यातील अनेक कॉलेज व शाळांमध्ये घडला आहे.
हेही वाचा - अवैध उत्खनन करणारे पोकलेन महसूल विभागाने केले जप्त शासनाने १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी भागातील विद्यार्थी वर्गाला परीक्षा शुल्क माफीचे परिपत्रक काढले आहे. मात्र, विद्यापीठ व कॉलेज प्रशासन याची कसलीच दखल घेत नसल्याचे विध्यार्थी बोलत आहेत. परीक्षा शुल्क भरले नाही, तर अर्ज भरण्यास कॉलेज प्रशासन नकार देत असल्याचे विध्यार्थी सांगत आहेत. हेही वाचा - महाबळेश्वर पुन्हा गारठले, पारा शून्य अंशावर परीक्षा शुल्क माफ केले असताना. दुष्काळी भागातील विद्यार्थी वर्गाकडून परीक्षा शुल्क घेतले जात आहे. प्रथम सत्रात शुल्क भरून घेऊन परत देण्यात येईल, असे कॉलेजने विध्यार्थ्यांना सांगितले होते. मात्र, ती फी परत न देता सत्र परीक्षा २ चे शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष पाटील यांनी आवाज उठवत कॉलेज प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.