• A
  • A
  • A
सम्राट निकम खून प्रकरणी रावण टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

सातारा - सम्राट निकम खून प्रकरणी रावण टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या खून प्रकरणानंतर मयुर जाधव उर्फ रावण व त्याच्या टोळीतील चौघांच्या मुसक्या सातारा शहर पोलिसांनी आवळल्या होत्या. मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्याने ही कारवाई होणार आहे.


टोळी प्रमुख मयुर जाधव उर्फ रावण, सौरभ खरात उर्फ कुक्या, धिरज शेळके, संग्राम दणाने, बाळकृष्ण जाधव, शशिकांत जाधव, विजय जाधव आणि बाळासाहेब तांगडे यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी तयार केला होता. तो परवानगीसाठी पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने या टोळी सदस्यांच्या मालमत्तेची माहिती घेऊन पुढील कारवाई होणार आहे.
वाचा-रखडलेला विकास पूर्ण करायचा असेल तर गोंदिया मध्यप्रदेशला जोडा - कमलनाथ
मयुर जाधव याच्या विरोधात दरोडा, खंडणी, दुखापत करणे, गर्दी जमवून मारामारी करणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गंभीर गुन्ह्याची मालिका मोठी असल्याने सातारा शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीच्या विरोधात मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. त्या वरती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मंजुरी दिल्याने रावण टोळीच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.

वाचा- रखडलेला विकास पूर्ण करायचा असेल तर गोंदिया मध्यप्रदेशला जोडा - कमलनाथCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES