• A
  • A
  • A
अॅसिडने भरलेला टँकर पलटी, चालकासह क्लिनर थोडक्यात बचावला

सातारा - खंबाटकी घाटात बेक्र निकामी होऊन अॅसिडने भरलेला टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातातून चालक व क्लिनर थोडक्यात बचावले आहेत.


हेही वाचा-साताऱ्यात वनविभागाच्या हद्दीत अवैध उत्खनन करणारे पोकलँड जप्त
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नायट्रिक अॅसिडने भरलेला टँकर (एम.एच.४३ यू. ४२६०) हा मुंबईहून उटी येथे चालला होता. खंबाटकी घाट उतरत असताना या टँकरचे बेक्र निकामी झाले. त्यामुळे चालक नियाज अहमद (वय ३३, उत्तरप्रदेश) याचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा टँकर एका वळणावर पलटी झाला. यामध्ये शाहनवाज खान (वय २२ भोपाळ) हा जखमी झाला आहे.
काही वेळातच भुईंज पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खंबाटकी घाटातील वाहतूक बंद करून योग्य ती खबरदरी घेतली होती. पलटी झालेला टँकरमधून पिवळ्या रंगाचा उग्र वायू बाहेर पडू लागल्याने वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविण्यात आली होती. स्थानिक प्रशासनाने पुणे येथुन 'एनडीआरएफ' च्या टीमला पाचारण करून टँकर बाजूला केला आहे. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा-माणदेशात वाढली दुष्काळाची दाहकता; नागरिक घेतायेत चारा छावणीचा आश्रयCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES