• A
  • A
  • A
माणदेशात वाढली दुष्काळाची दाहकता; नागरिक घेतायेत चारा छावणीचा आश्रय

सातारा - जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळ असलेल्या माण-खटाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. यामुळे या भागातील लोकांसह शेजारील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोक गावे सोडून आपल्या जनावरांना घेऊन चारा छावणीत येत आहेत.


हेही वाचा - दुष्काळी भागातील मदतनिधीसाठी १४५० कोटींचा पहिला हप्ता वितरित
माण आणि खटावमधील काही भागात प्रशासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. पण चारा छावण्या अजून चालू केल्या नाहीत. मात्र, म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशन आणि बजाज फाउंडेशनमार्फत खासगी चारा छावणी चालू करण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजाला दुष्काळासाठी दोन हात करण्यासाठी थोडी का होईना मदत झाली आहे. या ठिकाणी अनेक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहण्यासाठी आले आहेत. तसेच या ठिकाणी स्वयंपाक करून आपले संसार येथेच थाटले आहेत.

या छावणीत जवळपास ७ ते ८ हजार जनावरे दाखल झाली आहेत. तसेच रोज नवीन जनावरे दाखल होत आहेत. याठिकाणी ओला चारा, सुका चारा, पेंड तसेच शेतकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा दिली जाते. या उपक्रमामुळे सातारा, सांगली आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातील काही भागातील जनावरे वाचू शकली आहेत. त्यामुळे शेतकरी कुठे तरी थोडा फार समाधानी आहे.

हेही वाचा - कचऱ्यातून झ‍िरपणाऱ्या द्रवापासून वीज निर्मिती, 'आयआयटी' मुंबईतील प्राध्यापकांचा शोध
मात्र, शासनाने सुद्धा दुष्काळाची दखल घेवून या भागात छावण्या चालू करणे गरजेचे आहे. अन्यथा भयानक परस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती येथील सामान्य नागरिकांना व्यक्त केली आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES