• A
  • A
  • A
दुष्काळी गावामध्ये महसुलात शासनाची सूट

सातारा - जिल्ह्यातील १९ मंडलांमध्ये शासनाने दुष्काळ घोषित केला, मात्र शासनाने या भागात कोणतीही मदत दिलेली नाही. आज शासनाने दुष्काळी गावांमध्ये महसुलात सूट घोषित केली. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील २ लाख ८७ हजार ३४२ शेतकऱ्यांचा १० लाख ६३ हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. शासनाने १९ जिल्ह्यातील मंडलामध्ये नव्याने दुष्काळ घोषित केला आहे.


हेही वाचा-फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा युवक ताब्यात
जिल्ह्यातील माण तालुक्यात अतितीव्र दुष्काळ जाहीर झाला होता. कोरेगाव व फलटण या २ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. मात्र, खटाव तालुका यामधून वगळला होता. यानंतर खटाव तालुक्यातील आंदोलन तसेच मंत्रालयाच्या पायरीवर आमदार जयकुमार गोरे, आमदार शशिकांत शिंदे व आमदार बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला. त्यानंतर काही तालुक्यातील गावे दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आली.
यामध्ये खटाव तालुक्यातील वडूज, खंडाळा तालुक्यातील वाठार, लोणंद, वाई तालुक्यातील पाचवड, भुईंज, ओझर्डे, सुरूर या मंडळाचा दुष्काळी गावांमध्ये समावेश करण्यात आला आहे. शासनाने या गावांमधील महसुलात सूट घोषित केली आहे.

हेही वाचा-'अजितदादा बच गया, अब सातारा मे सीएम मरेगा'CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES