• A
  • A
  • A
फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा युवक ताब्यात

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा दौऱयादरम्यान जीवे मारण्याची धमकी देणारा पंकज कुंभार या युवकाला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईतील आगरिपाडा परिसरातून त्याला जेरबंद करण्यात आले. हा युवक मनोरुग्ण असल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा - 'अजितदादा बच गया, अब सातारा मे सीएम मरेगा'



पंकज कुंभार या युवकाने त्याच्या फेसबुक वॉलवर ४ फेब्रुवारीला सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांसह ४० हजार लोकांना मारण्याची धमकी दिली होती. यामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून तपासाला लागली होती. या युवकाला आगरिपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन सातारा पोलिसांच्या हवाली केले आहे.


हेही वाचा - चारा छावण्यांसाठी अर्ज करा, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे आवाहन


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES