• A
  • A
  • A
अवैध वाळू उपशावर पोलिसांची कारवाई; १८ जणांवर गुन्हा दाखल

सातारा - जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील येरळा नदीपात्रात चालू असलेल्या अवैध वाळू उपशावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये वाळू साठ्यांसह २ जेसीबी, ५ ट्रॅक्टर, १ चार चाकी, ३ दुचाकी वाहने, असा एकूण ७६ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी १८ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी १० आरोपी फरार झाले आहेत.


कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्ररेणा कट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान वाळू तस्करांना पोलिसांच्या अंगावर जेसीबी घालण्याचाही प्रयत्न करून जेसीबी चालक फरार झाला. याप्रकरणात ८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजार केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - हिमायतनगरमध्ये वाटमारी ; दोघांना लुटले, व्यापारी वर्गात धास्ती
महसूल विभाग व भरारी पथक बघ्याच्या भूमिकेत -
वाळू तस्करीला पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाने पथके तयार केली आहेत. मात्र, त्यांच्यामार्फत कारवाई होत नसल्याने प्रश्न निर्माण होत आहेत. याठिकाणी एका महिन्यात २ मोठ्या कारवाया पोलिसांनी केल्या. तसेच तहसीलदार यांनी स्वतः एक करवाई केली. मात्र, याठिकाणी असणारे तलाठी, पोलीस पाटील तसेच भरारी पथक कोणतीही करवाई करताना दिसत नाही. त्यामुळे महसूल प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे पथकातील कर्मचारी बदलण्याची मागणी होत आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES