• A
  • A
  • A
फलटण चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगर सह. पतसंस्थेच्या व्यवस्थापक संचालक व सदस्यांवर गुन्हे दाखल

सातारा - फलटण चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगर सह पतसंस्था मर्या. कोळकी फलटण पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करण्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात कोट्यवधींची फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक संचालक व सदस्य अशा १३ जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


फलटण शहर पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था मर्या. कोळकी फलटण पतसंस्थेचे व्यवस्थापक आणि संचालक व सदस्य नितीन शांतीलाल कोठारी, माधव कृष्णा अदलिंगे, प्रदीप बापूचंद गांधी, धनेश नावळचंद शहा, अजित रामनलाल दोशी, हर्षदा मोहनलाल शहा, भूषण कांतीलाल दोशी, नाना खंडू लांडगे, जावेद पापाभाई मनेर, लाला तुकाराम मोहिते, सुरेखा विरचंद मेहता, स्नेहल नेमचंद मेहता, अजय अरविंद शहा हे सर्व (रा. फलटण ता. फलटण जि. सातारा) यांच्या विरोधात राजेश मोहनलाल दोशी व भाग्यश्री कमलाकर भट यांनी तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा -साताऱ्यात ५०० रुपयांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात
त्यांनी १३,३६,२,२०१ एवढी रक्कम ठेव परत देण्यास वेळोवेळी टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात फसवणूक करून विश्वासघात केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात ४२०, ४०६, ४०९, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा -'बँक-पतसंस्थांना कर्ज वसुलीसाठी मिळणार पोलीस संरक्षण'

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES