• A
  • A
  • A
साताऱ्यात ५०० रुपयांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

सातारा - कांदा पिकाची पाहणी करून सातबारावर नोंद केल्याचा मोबदला म्हणून ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पिंप्रद (ता.फलटण) येथील तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. अनिलकुमार गौरीहर कुदळे ( रा. बिरदेववाडी, फलटण) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.


हेही वाचा - रत्नागिरीत ३ हजारांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास अटक
तक्रारदार यांची टाकळवाडी (ता.फलटण) येथे जमीन आहे. त्या ठिकाणी कांदा लागवडीची नोंद सात बाऱ्यावरती करण्यासाठी तलाठ्याने ५०० रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी तलाठ्याने १४ जानेवारीला लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या पडताळणीमध्ये समोर आले. बुधवारी तलाठी कुदळे याच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला. यानंतर त्याला आज अटक करण्यात आली आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES