• A
  • A
  • A
'बँक-पतसंस्थांना कर्ज वसुलीसाठी मिळणार पोलीस संरक्षण'

सातारा - नागरी बँक व पतसंस्थांना कर्ज वसूलीसाठी आता तात्काळ पोलीस संरक्षण मिळणार आहे. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली.

राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर


हेही वाचा - पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी
सहकारी बँक आणि पतसंस्थाना कर्ज वसूलीसाठी मागणी केल्यानंतर तत्काळ पोलीस संरक्षण देणेचे बंधनकारक आहे. शासनाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. पूर्वी नागरी बँक आणि पतसंस्थांना कर्ज वसूलीसाठी पोलीस संरक्षण मिळण्यास अडचणी येत होत्या. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २९ जानेवारीला सहकारी बँक आणि पथसंस्थाना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - चंदा कोचर दोषी, चुकीच्या पद्धतीने कर्ज दिल्याचा अंतर्गत चौकशीचा...
कर्जदारांच्या वसूलीसाठी १५ दिवस अगोदर पोलिसांना सूचना देणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे वसुलीला गती येईल व पोलीस संरक्षणामुळे वसूली होईल आणि सहकारी संस्था सक्षम होतील, असा विश्वास राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - जळगावात पंजाब नॅशनल बँकेची साडेपाच कोटींची फसवणूक; ८ जणांविरुद्ध...



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES