• A
  • A
  • A
माढ्यातील धुसफूस उघड; अजित पवारांसमोरच देशमुख समर्थकांची घोषणाबाजी

सातारा - सध्या राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निर्धार रॅली काढण्यात येत आहे. मात्र, फलटण येथील निर्धार परिवर्तन सभेत माढा लोकसभा मतदारसंघातली गटबाजी समोर आली. यावेळी अजित पवार यांचे भाषण संपल्यानंतर धनंजय मुंडे भाषणाला उठले असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.


हेही वाचा - अजित पवारांसमोरच राष्ट्रवादीत गटबाजी; महाडिक यांच्या विरोधात मुश्रीफ गटाची घोषणाबाजी
कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माढा लोकसभा मतदारसंघात कोणतीही धुसफूस चालू नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र, त्यांच्यासमोरच मतदारसंघातील पक्षांतर्गत गट बाजी दिसून आली आहे. या घटनेमुळे आता पवार कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES