• A
  • A
  • A
मोदींची बस चुकली, येणारा अर्थसंकल्प फक्त मतांसाठीच - जयंत पाटील

सातारा - भाजपचा ५ राज्यात पराभव झाल्यामुळे १ फेब्रुवारीला केंद्र सरकार जो अर्थसंकल्प मांडणार आहे, त्यामध्ये मोदी सरकार भारतातील जनतेला टोकाची आश्वासने देणार आहे. हे बजेट फक्त मते घेण्यासाठी असेल, निश्चित काम करण्यासाठी नसेल. त्यामुळे नरेंद्र मोदींची बस चुकली आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत केले.हेही वाचा -काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा सुटला तोल
शेतकरी मजूर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था या सर्वांचा बोजवारा उडण्याचे कारण म्हणजे नरेंद्र मोदींची धोरणे आहेत. हे ग्रामीण भागातील लोकांना पटले आहेत. ५ वर्षांत दिलेली आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केली नाहीत, असे मत पाटील यांनी मांडले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

हेही वाचा -'चार वर्षांपूर्वीच ढोबळे यांनी सोडली होती राष्ट्रवादी'
महाराष्ट्रात देखील तीच अवस्था आहे -

विधानसभेत १६ मंत्र्यांच्या ९० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे लिखित स्वरूपातील, ज्याला फाईलवर आधार आहे. त्या प्रत्येकाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देण्याच्या पलीकडे काही केलेले नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES