• A
  • A
  • A
माणदेशी फाऊंडेशनच्या माण तालुक्यातील चारा छावणीला रोहित पवारांची भेट

सातारा - माण तालुक्याला नेहमी भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चेतना सिन्हा यांनी माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील पहिली चारा छावणी चालू केली आहे. या चारा छावणीला पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी भेट दिली.


हेही वाचा - मलकापूर नगरपरिषदः काँग्रेसने गड राखला, पंढरपूर मंदिर समितीचे अतुल भोसलेंना धक्का
सिन्हा यांच्या चारा छावणीमुळे या भागातील पशुधन जगले अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. रोहित पवार यांनी सुमारे ३ तास या ठिकाणी शेतकरी वर्गाची आणि मुलांची भेट घेऊन विचारपूस केली. या छावणीतील शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा -एकरकमी एफआरपीसाठी साखर संकुलावर स्वाभिमानीचा मोर्चा
'या छावणीत ८ हजार जनावरांना ओला-सूका चारा, पेंढ, पाणी-पुरवठा इतक्या चांगल्या प्रकारे दिला जात आहे, की शासनसुध्दा इतक्या चांगल्या प्रकारे हे पुरवू शकत नाही. हे सर्व माणदेशी फाऊंडेशनच्या मदतीने होत आहे, ही आव्हानात्मक बाब आहे', असे पवार यावेळी म्हणाले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES