• A
  • A
  • A
सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानीला सोडण्याच्या हालचालींना वेग, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

सांगली - लोकसभेची जागा स्वाभिमानीला देण्याबाबत सुरू असलेल्या हालचालींमुळे सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. पक्षाच्या या निर्णयाचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज कमिटी कार्यालयाला टाळे ठोकले. कोणत्याही परिस्थितीत ही जागा कोणालाही देऊ नये. अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशारा कार्यकरत्यांनी दिला आहे.


हेही वाचा - सांगलीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन
सांगली लोकसभेची जागा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसकडे आहे. मात्र, या निवडणुकीत सांगलीची जागा, ही अन्य पक्षाला देण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू आहे. काँग्रेस आघाडीत सामील झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली लोकसभेची जागा देण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे संतप्त झालेली काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी शहरातील काँग्रेस कार्यालयात एकत्र येत जागा अन्य पक्षाला देण्यास विरोध केला आहे.
हेही वाचा - हातकणंगले मतदारसंघ : राजू शेट्टींच्या विरोधात रघुनाथ पाटील दंड थोपटणार..
सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असून या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार द्यावा, अशी मागणी संतप्त कार्यकर्त्यांनी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस हाय कमांडविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवून काँग्रेस कार्यालयाला टाळे ठोकले आहे. सांगलीच्या जागेवर काँग्रेसचाच अधिकार असल्याच्या भावना व्यक्त करत काँग्रेसने आपला निर्णय बदलावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच हा वसंतदादांचे घराणे संपवण्याचा कुटील डाव सुरू असल्याचा आरोपही वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी केला आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES