• A
  • A
  • A
सांगली अथवा वर्ध्याची जागा स्वाभिमानी लढवणार

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेसाठी स्वाभिमानीला अधिक जागा देण्याचे ठरले आहे. त्यामुळे लोकसभेच्या २ जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतःचा उमेदवार उभा करणार आहे. त्यांना हातकणंगले सोबतच सांगली किंवा वर्ध्यापैकी एक जागा देण्याचे काँग्रेसचे केंद्रीय नेते अहमद पटेल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली.


शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हातकणंगलेसोबतच सांगली किंवा वर्ध्याची जागा मागितली होती. यापैकी हातकणंगले मिळाली असून सांगली अन्यथा वर्धा देण्याबाबत काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे. काँग्रेसचे केंद्रीय नेते अहमद पटेल यांनी थोड्या वेळापूर्वी सांगली अथवा वर्ध्याची जागा देण्याचे मान्य केले आहे.
देशातील भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी आपण काँग्रेस आघाडीमध्ये सामील झालो आहोत. भाजप विरोधात सर्व घटकपक्षांना एकत्र करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून लोकशाही चळवळ टिकवण्यासाठी वंचित बहुजन विकास आघाडीने सोबत यावे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले आहे. ते कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये बोलत होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES