• A
  • A
  • A
सांगलीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन

सांगली - लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्ह्यातील एनजीओ आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यामध्ये जिल्ह्यात मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम व मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली लोकसभेसाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे.सांगली लोकसभेसाठी २३ एप्रिलला मतदान पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अनेक संस्था प्रतिनिधींनी वेगवेगळे उपाय आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम सुचवले. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, वैद्यकीय तसेच वेगवगेळ्या क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी सर्वांनी मतदानाचा टक्का वाढवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. मतदान जागृतीसाठी पोस्टर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य तसेच वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर शाळा महाविद्यालय स्तरावर सुद्धा तरुणांमध्ये पथनाट्य तसेच अनेक उपक्रम घेण्यात येणार आहेत.

या बैठकीस सांगली लोकसभा मतदान जागृती समन्वयक अधिकारी, महापालिकेच्या उपायुक्त मौसमी बर्डे, माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रामपंचायत), प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, जिल्हा क्रिडाधिकारी माणिक वाघमारे, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES