• A
  • A
  • A
हातकणंगले मतदारसंघ : राजू शेट्टींच्या विरोधात रघुनाथ पाटील दंड थोपटणार..

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टींच्या विरोधात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दंड थोपटले आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.


काँग्रेस आणि भाजपा विरोधातील घटक पक्षांना घेऊन तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत उतरणार असून वंचित बहुजन विकास आघाडीसोबतही बोलणी सुरू असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ते आज सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आणि देशात भाजपा आणि काँग्रेसकडून सुरू असलेल्या लुटीच्या विरोधात आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे आज रघुनाथ पाटील यांनी स्पष्ट केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असल्याचे जाहीर करत, गेल्या १० वर्षांपासून राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आणि मतदारसंघाचा न केलेला विकास यामुळे आपणही लोकसभा निवडणुक लढवणार आहे. २००९ साली आपण शिवसेनेकडून आणि २०१४ साली आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवली.
मात्र आता काँग्रेस आणि भाजपाच्या विरोधातील घटकांना सोबत घेऊन निवडणूक लढणार असून तिसरी आघाडी असणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडी सोबत शेतकरी संघटनेची चर्चा सुरू असल्याचेही यावेळी रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी नेत्या विरुद्ध शेतकरी नेता अशी लढत होणार आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES