• A
  • A
  • A
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २ गुन्हेगारी टोळ्यांतील ६ जण ४ जिल्ह्यातून तडीपार

सांगली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांना दणका दिला आहे. शिराळा तालुक्यातील २ टोळ्यांतील ६ जणांवर सांगलीसह ४ जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.


सांगली जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी गुन्हेगारी टोळी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अनेक टोळ्यांना मोका लावत हद्दपारीची कारवाई केली आहे, तर सध्या पार पडत असणाऱ्या निवडणुका लक्षात ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिराळा तालुक्यातील २ टोळ्यांवर तडीपारीची कारवाई केली आहे. या सर्व सराईत गुन्हेगारांवर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात १७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा - शरद पवारांनी वडिलांबद्दल केलेले वक्तव्य दुर्दैवी - राधाकृष्ण विखे पाटील
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सुभाष गोसावी, विकास गोसावी, विकी गोसावी, नितीन यादव, अनिल कोणीन आणि मानव उर्फ राघव लखे या ६ जणांना सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES