• A
  • A
  • A
अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान सोहळा पडला पार

सांगली - शिवाजी विद्यापीठाअंतर्गत अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवी दीक्षांत सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. आष्टा येथे महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी मंत्री आण्णासाहेब डांगे आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकुलपती यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.महाविद्यालयातील सुमारे १०० हून अधिक पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या प्रसंगी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. डी. नांदवाडकर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ६० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाण पत्र देण्यात आले.

याप्रसंगी बोलताना माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी म्हणाले, की आज या महाविद्यालयाचा लौकिक या सोहळ्याच्या निमित्ताने वाढला असून आपल्या पश्चात या शैक्षणिक संकुलाचे नाव मल्हारराव होळकर करण्याचा आपला मानस आहे. तो महाविद्यालय प्रशासन मंडळ नक्की पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES