• A
  • A
  • A
अनिकेत कोथळे खून प्रकरण : ७६ दस्ताऐवजांची यादी न्यायालयात सादर

सांगली - संपूर्ण राज्यात गाजलेल्या अनिकेत कोथळे खूनप्रकरणी ७६ दस्तऐवजांची यादी सांगली न्यायालयात सादर करण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही यादी सादर केली आहे. याबाबत विरोधी बचाव पक्षाला न्यायालयाकडून नोटीस देण्यात आली आहे.


संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सांगली शहर पोलीस ठाण्यातील अनिकेत कोथळे खून खटल्याप्रकरणी सांगली न्यायालयात ७६ दस्ताऐवज सादर झाले आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उपस्थिती लावत हे दस्तावेज न्यायालयात सादर केले आहेत.

या दस्तऐवजांनुसार बचाव पक्षाला कायद्यानुसार नोटीस देण्यात आली असून त्यावर संशयितांनी उत्तर दिले नाही. तर यादीनुसार यातील कोणते कागदपत्रे तुम्हाला मान्य आहेत किंवा मान्य नाही ते सांगा त्यानुसार पुढच्या वेळेस आम्हाला साक्षीदारांना न्यायालयात पाचारण करण्यात येईल, असा युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला आहे. यावर बचाव पक्षाकडून उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतली असून २२ मार्चपर्यंत सर्व संशयितांकडून उत्तर मिळणे अपेक्षित आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES