• A
  • A
  • A
हॉर्स रायडिंगचा थरार : काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

सांगली - हॉर्स रायडिंगचा एक थरारक व्हिडिओ सध्या सांगलीच्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरधाव धावणाऱ्या घोड्यावरून पडून पुन्हा त्याच भरधाव घोड्यावर स्वार होण्याचा हा चित्तथराराक सिनेस्टाईल दृश्य कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


या व्हिडिओचा सोशल मीडियावर बोलबाला सुरू आहे. घोड्यांच्या शर्यतीत घोडा भरधाव धावत आहे आणि त्यावरील घोडेस्वार अचानक घोड्यावरुन पडतो, मग पुन्हा उठतो आणि त्या घोड्याचा पाठलाग करून त्याच्यावर पुन्हा स्वार होतो. अशी दृश्य खरेतर आपण अनेकवेळा चित्रपटात पाहिली आहेत. पण असाच सीन वास्तवात घडला तर आपला त्यावर विश्वास बसणार नाही.

पण प्रत्यक्षात असे घडले असून हा थरारक दृश्यांचा व्हिडिओ सध्या सांगलीच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका गावातील रस्त्यावर घोड्यांच्या शर्यती दरम्यान भरधाव घोड्यावर स्वार असणारा मुलगा अचानक खाली कोसळला. घोड्याचा धावताना तोल गेल्याने ही घटना घडली. त्यामुळे घोड्यावरील मुलगा कोलांट्या उड्या खाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडला.

या घटनेमुळे घोडेस्वाराला गंभीर दुखापत झाल्याची भावना आल्या शिवाय राहत नाही. तर या घटनेनंतर घोडा तसाच सुसाट धावत होता आणि याच धावत्या घोड्यावरून दुचाकीच्या माध्यमातून खाली पडलेला मुलगा पुन्हा सुसाट घोड्यावर स्वार होऊन ताबा घेतल्याचे पाहायला मिळते.

सांगलीच्या सोशल मीडियावर सध्या चलती असणारा हा व्हिडिओ नेमका कुठला आहे. हे कळू शकलेले नाही. कवठेमहांकाळ तालुक्यातील ही घटना असल्याची चर्चा नेटिझन्सकडून व्यक्त करण्यात येत आहे. पण हे सिनेस्टाईल चित्तथराराक दृश्य पाहून कोणीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES