• A
  • A
  • A
शेळी चोरीचा संशय, जमावाच्या मारहाणीत मजुराचा मृत्यू

सांगली - शेळी चोरीचा संशयाने जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत एक जण ठार झाला. ही घटना मिरजधील कृष्णा घाट येथे घडली असून दादू राठोड असे मृत झालेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या आठ आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

घटनास्थळी दाखल झालेले पोलीस


मिरजेतील नितीन पाटील यांच्या शेतात ऊस तोडणी करण्यासाठी जत तालुक्यातील करेवाडी येथील टोळी आली आहे. रात्री 12 वाजताच्या सुमारास शेळ्या ओरडल्याने टोळीतील ऊस तोडणी मजूर जागे झाले. यावेळी शेळ्या चोरी करण्यासाठी आलेल्या दादूला पाहून टोळीतील मजुरांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. यानंतर ऊसतोड मजुरांनी दादू राठोडला मिरजेच्या गांधी चौकी पोलीस ठाण्यात दुचाकीवरुन नेऊन हजर केले. यानंतर पोलिसांनी दादू राठोडला गंभीर मारहाण झाल्याने उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

दादू राठोड याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी 8 ऊसतोड मजुरांना अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पुढील तपास सुरू केला आहे. शासकीय रुग्णालयात मृत दादू राठोडच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन राठोड कुटूंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी दादू राठोडच्या नातेवाईकांनी केली आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES